जिल्हाधिकारी यांनी नाकारली परवानगी.
गडचिरोली:- यात्रा - जत्रांना शेकडो / हजारो लोकांचा जनसमुदाय विविध भागांतून दरवर्षी येत असतात ज्यामुळे सद्यस्थितीत प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोविड-19 साथरोग संदर्भाने परिस्थिती नियंत्रणात असून भविष्यात सदर गर्दीमुळे मोठया प्रमाणावर कोविड-19 परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच राज्यात धार्मिक स्थळे/ प्रार्थनास्थळे सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक तत्वे व आदर्श कार्यप्रणाली आखून देण्यात आलेली असून मोठया प्रमाणावरील गर्दी टाळण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. कुरखेडा, चामोर्शी, सिरोंचा, देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी, सलंगटोला, खोब्रामेंढा, मार्कंडादेव, चपराळा, हजरत वली हैदरशाह बाबा ऊर्स कार्यक्रम, देसाईगंज तालुक्यातील संभाव्य भरणाऱ्या यात्रा-जत्रांना कोविड-19 साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत परवानगी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नाकारली आहे.
Popular posts......लोकप्रिय पोस्ट ......
गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....
आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.
चंद्रपूरांनो सावधान! 500 रु. तर मिळणार नाहीत, पण गंडा कितीचा बसेल सांगताही येणार नाही.
राजुरा ब्रेकिंग न्यूज; राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.