Top News

चेक विठ्ठलवाडा रोडवर दुचाकीचा भीषण अपघात.

एकाचा मृत्यू तर तिन जण जखमी.
Bhairav Diwase.     Feb 24, 2021
गोंडपिपरी:- तालुक्यातील चेक विठ्ठलवाडा (तांडा) मार्गावर  दि.२४ बुधवारी दुपारी वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकली MH 34 T 4377 आणि MH 33 L 7706 एकमेकांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बंडू भाऊजी गदेकर वय (४५) रा.गंगापुर टोक तालुका पोंभुर्णा हे जागेवरच ठार झाले. ते काही कामानिमित्त भं तळोधी येथे जात होते आणि वाटेतच अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघातग्रस्तांची स्थिती गंभीर आहे. या अपघातात उर्मिला वेणूराज चिताळे, आशा अंकज कस्तुरे, अंश दिवाकर कस्तुरे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी गोंडपिपरी पोलिस दाखल होऊन जखमींना उचारासाठी रुग्णालयात नेले असून. पुढील तपास ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कातकर, पानेकर, शंकर मने, विलास कोवे, अनिल चव्हाण, अमित गुरनुले  करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने