चंद्रपुर महामार्ग पोलिसांच्या वतीने मृत्यूंजय दुतांचा सत्कार.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- रोड अपघातातध्ये मृत्युचे प्रमाण वाढत असल्याने सर्वोच्च न्यायालय समिती प्रमाणे दरवर्षी १० टक्के अपघात कमी करण्याचे उदेशाने दरवर्शी केंद्र शासन व महाराश्ट्र शासन रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येते. त्या माध्यमातुन अपघात कमी अपघात कमी करण्याच्या उदेषाने प्रत्येक राश्ट्रीय महामार्ग ९३० कोंडाफाटा नेहमी प्रबोधन घेण्यात येते. डॉ. भुषणकुमार उपाध्याय सा.अपर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा संकल्पनातुन  हायवे मृत्युजय दूत ‘‘ ही योजना दि. १ मार्च पासून राबवण्यात येत असल्याने दि.१ मार्च रोजी मृत्युंजय दूत ईच्छुक ईसम मृत्युजय दूत म्हणुन नेमणुक करण्यात आले .०१ मार्च २०२१ ला अपघातील जखमीनां कसे हाताळाचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. 
      मुल रोडवरील आमला फाटा व जानाळा येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्यूंजय दूत यांनी जखमीना तात्काळ मदत करून त्यांना सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथे दाखल केले. म्हणुन महामार्ग पोलीस केंद्र चंद्रपुर यांच्या तर्फे मंगेष निवलकर, निखील पदीलवार, अनिल डाखरे, पंकज भोयर, अनिकेत देवगडे यांना पुष्पगुच्छ देवुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भुषणकुमार उपाध्याय सा.अपर पोलीस महासंचालक (वा) महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतुन श्रीमती श्वेता खेडेकर पोलीस अधिक्षक,  संजय पाडे पोलीस उपअधिक्षक  वैषाली वैरागडे पोलीस निरिक्षक  यांच्या मार्गदर्शन नुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोउपनि बालाजी देवडे,सहा पो.देशकुमार खोब्रागडे, पो.ह. हिरालाल वेलथरे, पो.ना.निमई रॉय, प्रेमदास दासलवार आणि पो.कॉ. प्रशांत देरकर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने