Top News

मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा वळणावर ट्रकच्या चक्क्यात येवून जागीच मृत्यू.

वरोरा शहरातील आनंदवन चौक मधील दुर्दैवी घटना.
Bhairav Diwase.    March 23, 2021
वरोरा:- वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे ट्रक व दुचाकी च्या अपघातात दुचाकीस्वार घटनास्थळी मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना दुपारच्या सुमारास घडली असून MH34 AD 9756 या क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर वरून चिमूर येथे जात असताना वरोरा शहरातील आनंदवन चौक येथे चिमुर मार्गाच्या वळणावर मागून येणाऱ्या MH34 AF 9934 या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने तोल गेल्याने समोरच्या चाकात अडकुन घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघातग्रस्त दुचाकी वर चालक व एक मुलगा बसून होता त्यातील एकाला चंद्रपूर ला जिल्हा सामान्य रुग्णालय ला पाठविण्यात आले आहे. दुचाकीस्वार मयूर पांडुरंग सिदाम रा. बांद्रा (बोरगाव) वय वर्ष 23 व अजय नंदराज देवतळे रा. बांद्रा(बोरगाव)वय वर्ष 24 असे दुचाकीस्वाराची नावे आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने