जेष्ठ नागरीकांना व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अफझल भाई यांनी शहरातील कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन स्वतःचे तथा आपल्या कुटुंबातील जेष्ठ नागरीकांचे कोविड लसीकरण करवून घेतले. त्याचप्रमाणे शहरातील जेष्ठ नागरीकांनी तथा शासकीय कर्मचाऱ्यांनी शहरामधील कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन आपले नाव नोंदवून स्वतःचे लसीकरण करवून घ्यावे व स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षीत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी शहरातील जेष्ठ नागरीकांना केले.
भद्रावती येथे कोविड लसीकरण केंद्रावर कोविडची लस उपलब्ध असून येथे जेष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आले. कोविड लसीकरणाची दोन कोर्स असून प्रत्येक जेष्ठ नागरीकाला २८ दिवसानंतर दोन वेळा लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या शहरात वाढत चाललेला कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता. जेष्ठ नागरीकांनी स्वतःचे लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.