विध्यार्थीना दिली सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड, रोपवाटीके विषयी माहिती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- सामाजिक वनीकरण विभाग राजुरा तर्फे जागतिक वन दिन व जल दीनाचे औचित्यसाधून आधुनिक रोपवाटिका सुमठाणा येथील रोपवाटिकेत विध्यार्थीना व्रूक्ष लागवड, वृक्ष संगोपन, विविध प्रजातीच्या वृक्षाची माहिती, रोप तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेचे राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथि म्हणून उमेश जंगम वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वणिकरण विभाग राजुरा ताकसांडे ,उप सरपंच , ग्रा.पं.सुमठाणा , सुनील झाडे , अनिल नन्नावरे ,सहायक शिक्षक , लाल बहादुर शास्त्री विद्यालय , गडचांदूर यांची उपस्थिति होती.
सुरुवातीला श्रुति रायपुरे , डिंपल झाडे ,अनुश्का केशट्टिवार या विध्यार्थीनी पर्यावरण संवर्धन व पाण्याचे संगोपन यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जागतिक वन दिन व जल दिनाचे महत्व विशद केले. उमेश जंगम , वनपरीक्षेत्र अधिकारी व विलास कुंदोजवार , वनपाल यांनी आधुनिक रोपवाटीकेतील व्रुक्ष लागवड , रोप निर्मिती प्रक्रिया ,व्रूक्ष संवर्धन , विविध प्रजातींच्या झाडाचि नावे व त्यांचे उपयोग याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी व्रूक्षारोपन करावयाची तांत्रिकदृष्ट्या पधत आणि व्रूक्षारोपन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विलास कुंदोजवार , वनपाल , सामाजिक वनीकरन विभाग राजुरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या विध्यार्थी तसेच सामाजिक वनीकरन विभागाच्या कर्मचार्यांंनी अथक परिश्रम घेतले.