रंग खेळून अंघोळ करण्याकरिता गेला होता नदीवर.
बल्लारपुर:- बल्लारपुर तालुक्यातील ऋषिकेश होळीच्या दिवशी रंगपंचमी चा रंग खेळून घरी परत येऊन आराम करीत असतानाच मित्राचा फोन आला आणि घरच्यांना न सांगता मित्रा सोबत नदी वर अंघोळ करण्या करिता गेला. तो परत आलाच नाही. आणि दुपारी 2 वाजता ऋषिकेशचा मित्र मृतक ऋषिकेश संजय कोतपल्लीवारची गाडी घेऊन घरी आला. आणि घडलेला प्रकार सांगितला घरच्यांना दुःख चा डोंगर कोसळला. घटनेची बातमी कळताच वडील संजय कोतपल्लीवार यांनी पोलीसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतकाचा शोध घेतला. आणि शव ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनकरिता पाठवले. संजय ला एकुलता एकच मुलगा होता तो येनबोडी येथे ITI चे शिक्षण घेत होता. आणि एक मुलगी आहे. पुढील तपास बल्लारपुर पोलीस करीत आहे.