चामोर्शी:- होळीचा दुसरा दिवस म्हणजे रंगपंचमी. होळी/रंगपंचमीचा सण अनेकांच्या आयुष्यात सुख घेऊन येतो. परंतु यावर्षी रंगपंचमी हा सण पिल्ली कुटुंबियासाठी आयुष्यात न विसरण्यासारखे दुःख घेऊन आला.
गडचिरोली जिल्हात चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील पवन पिल्ली हा युवक मित्रासोबत विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा घाटावरील चिचडोह येथे दुपारच्या दरम्यान अंघोळी करिता उतरतांना तोल गेला. आणि नदीत पडला. नदीत बुडू लागताच मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पवन पिल्ली नदीत खोल पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहे.