चंद्रपूर:- चंद्रपूर रस्त्यावर धानोरा फाट्या जवळील चंद्रपूर कडून घुग्गुस कडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 34 बिजी 7719 या वाहणाचा पल्ला दुचाकी क्रमांक एम. एच. 32 टी 6988 लागल्यामुळे तो ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यु झाला. ही घटना दुपारी 12.15 वाजताच्या सुमारास झाली असून मृतकाचे नाव शशिकांत देवराव परसुटकर (28)रा. जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर असल्याचे सांगितले जाते. घुग्गुस पोलिसांनी घटना स्थळावर जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार मंगेश निरंजने करीत आहे.