Top News

पिकअप- बसची समोरासमोर धडक.

अपघातात 4 ठार तर 8 जण गंभीर जखमी; मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता?
Bhairav Diwase.   March 28, 2021

आष्टी:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरावर काळाचा घाला. दुपारच्या सुमारास घटना घडली. आष्टी- आलापल्ली रोडवर चंदनखेडी जवळ पिकअप-बसचा भिषण अपघात झाला. 

होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी मजुरावर काळाचा घाला.


दुपारच्या माहितीनुसार या अपघातात दोघे जागीच ठार झाले होते. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मजूर आवळगाव, हळदा ता. ब्रम्हपुरी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी व्यक्तींना गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत.

सायंकाळच्या माहितीनुसार 2 व्यक्तींचा उपचाऱ्यादरम्यान मृत्यू झाला तर 8 गंभीर जखमी आहेत. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये आवडगाव येथील 02 तर हळदा येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे.

 अश्यातच आज TS04 UD 5840 या पिकअप मजुरांना घेऊन स्वगावी येत होती. या पिकअपला MH40 Y5601 या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ची जोरदार धडक बसली. यात काही मजुरांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे होळीचा दिवशी मिर्ची तोडणी मजुरांवर काळाचा घातला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने