होळीच्या पर्वावर भद्रावती तालुक्यात १ लाखाची २१ हजाराची दारु जप्त.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- होळी या सणानिमित्याने अवैध दारु व्यावसायिकांनी डोके वर काढले असून होळी पेटण्याच्या आदल्या दिवशी भद्रावती तालुक्यात १ लाख २१ हजाराची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली. 

          प्राप्त माहितीनुसार, होळीच्या पर्वावर अवैध दारु विक्रीला उधाण येते. या बाबीचा विचार करुन नागपूर येथील दारुबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दि.२७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता येथील भंगाराम वार्डात टाकलेल्या धाडीत २४ हजाराची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली.याप्रकरणी गुलाब गोविंदा नान्हे(३१) आणि प्रतीक प्रकाश गेडाम(२०) यांना अटक करण्यात आली. 
          
    तसेच माजरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या नाकाबंदीत वाहनाची झडती घेतली असता ९७ हजार ४०० रुपयाची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली. एम.एच.४६ एल.४६४६ क्रमांकाची एक ह्युंडईची वरना कार अवैध दारुसह वणीवरुन वरोराकडे जात असल्याची गुप्त माहिती माजरी पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी पाटाळा फाट्यावर नाकाबंदी केली. दरम्यान उपरोक्त वरना कार थांबवून झडती घेतली असता डीक्कीत प्लाॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ५०० मि.लि. मापाच्या किंगफिशर दारुच्या १५८ शिशा आणि ९० मि.लि. मापाच्या राॅकेट संत्रा देशी दारुच्या  ५०० निपा आढळून आल्या. पोलिसांनी ही दारुची अवैध वाहतूक करणा-यांकडून ९७ हजार ४०० रुपयाची दारु, ७ लाखाची वरना कार, २१ हजाराचे ३ भ्रमनध्वनीसंच असा एकुण ८ लाख १८ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी हर्षवर्धन दिवाकर निमगडे(२५) रा. आंबेडकर नगर बाबुपेठ चंद्रपूर, सचिन अशोक नेरकर (३४) रा. ठक्कर काॅलनी,गुरुकृपा  अपार्टमेंट चंद्रपूर, रोशन हरिदास उराडे (३६) रा. महाकाली वार्ड,गौतमनगर चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनीत घागे,स.पो.नि.अजितसिंग देवरे, स.फौ.किशोर मित्तरवार, पोलिस हवालदार अतुल गुरनुले, अनिल बैठा, श्रीकांत मोगरम,गुरु शिंदे आणि अमोल रामटेके यांनी केली.