Top News

मोठा अनर्थ टळला! माओवाद्यांचा घातपाताचा मोठा कट पोलिसांनी उधळला.

Bhairav Diwase.    March 28, 2021
गडचिरोली:- माओवाद्यांचा घातपाताचा कट पोलीस कमांडोंनी उधळून लावला आहे. खोब्रामेंढा जंगलात तीनवेळा माओवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतवून लावला.Bhairav Diwase. March 28, 2021 गडचिरोली:- माओवाद्यांचा घातपाताचा कट पोलीस कमांडोंनी उधळून लावला आहे. खोब्रामेंढा जंगलात तीनवेळा माओवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतवून लावला. माओवाद्यांचं टीपागड पहाडीवर प्रशिक्षण शिबीर होतं. कंपनी दलमसह 70 माओवादी शिबीरात उपस्थित होते. विशेष अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात सी-60 कमांडोनी प्रशिक्षण शिबीर उद्धवस्त केलं. यावेळी झालेल्या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून एक बंदूक, काही काडतुसे, तीन आयडी बॉम्ब, भूसुरुंग स्फोट करणारे पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तब्बल 24 तासाच्या कोम्बिंग ऑपरेशननंतर आज हे पोलीस पथक गडचिरोली येथे सुरक्षित दाखल झालं आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे माओवाद्यांकडून घातपातासाठी रचण्यात येत असलेला कट आधीच उधळला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली होती. या घटनेत 5 जवान शहीद, तर 8 जण गंभीर जखमी झाले होते. एकूण 50 च्या आसपास जवान या बसमधून प्रवास करत होते.

माओवाद्यांचं टीपागड पहाडीवर प्रशिक्षण शिबीर होतं. कंपनी दलमसह 70 माओवादी शिबीरात उपस्थित होते. विशेष अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात सी-60 कमांडोनी प्रशिक्षण शिबीर उद्धवस्त केलं. यावेळी झालेल्या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून एक बंदूक, काही काडतुसे, तीन आयडी बॉम्ब, भूसुरुंग स्फोट करणारे पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

तब्बल 24 तासाच्या कोम्बिंग ऑपरेशननंतर आज हे पोलीस पथक गडचिरोली येथे सुरक्षित दाखल झालं आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे माओवाद्यांकडून घातपातासाठी रचण्यात येत असलेला कट आधीच उधळला गेला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली होती. या घटनेत 5 जवान शहीद, तर 8 जण गंभीर जखमी झाले होते. एकूण 50 च्या आसपास जवान या बसमधून प्रवास करत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने