Click Here...👇👇👇

गरीब जनतेला स्वस्त धान्य मिळवून द्या.

Bhairav Diwase
नगरसेवक डाखरे यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत गरजू गरीब जनतेला स्वस्त धान्य मिळवून द्या, अशी मागणी येथील भाजपा नगरसेवक तथा शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे नुकतीच केली आहे.
      जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक डाखरे यांनी म्हटले आहे की, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत गरजू गरीब लोकांना स्वस्त धान्य मिळत नाही. कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनमुळे लोकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे.हाताला काम नाही, काम केले तर दाम नाही.अशा परिस्थितीत सर्वसामान्य गरीब जनतेस दुकानातून अनाज व जिवनावश्यक वस्तू नगदी स्वरुपात विकत घ्यावे लागत आहे. हातात पैसा नसल्या कारणाने आर्थिक विवंचनेत गरीब माणूस होरपळून निघत आहे. वाढत्या महागाईत गरीबाने कसे जगावे ही एक समस्या आहे. नगरसेवक या नात्याने आपल्याकडे अनेक लोकं ही समस्या घेऊन येतात. गरीबांची होणारी होरपळ थांबवावी.कोणत्याही गरीब माणसाची उपासमार होऊ नये.याकरीता गरजू गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळवून देण्याचा आदेश पारीत करावा व गरीबांना न्याय द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नगरसेवक प्रशांत डाखरे यांनी निवेदनातून दिला आहे.निवेदन सादर करताना माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहिर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.