भद्रावती शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या.

Bhairav Diwase
अज्ञात चोरट्यांनी सहा लाखाचा ऐवज लांबविला.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील गौतमनगर येथील एकाच रात्रौला दोन ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सहा लक्ष रुपयांचा ऐवज लांबविला सदर घटना दि.२ मार्च ला रात्रौ ला घडली.

            गौतम नगर येथील अनिल गोडे हे आपल्या कुटूंबासह घरात झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घराच्या समोरच्या दाराची कडी तोडून आत प्रवेश मिळविला व कपाटाच्या घरातच मिळालेल्या च्याबीच्या सहाय्याने कपाटातून एक तीन ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे टॉप्स, पाच ग्रॅमचा गोफ, तीन ग्रॅमची नथ, दोन ग्रॅमची रिंग, व एक ग्रॅमचे मणी असा सोन्याचा ऐवज व एक ज्युपीटर स्कुटर असा ऐवज पळविला असतांना त्यांनी घरातील एटीएम कार्ड सोबत नेऊन त्याच्या सहाय्याने एटीएममधून पाच हजार पाचशे रुपये पळविला. हा सर्व माल ४ लक्ष ५० हजाराचा आहे. याच वार्डातील किरयाने राहणाऱ्या व मित्राच्या घरी गेलेल्या सुनील रतन निकुरे याच्या घरात प्रवेश करून पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, दोन तोड्याचा गोफ, तीन तीन ग्रॅमच्या जीवत्या असा सोन्याचा ऐवज व नगदी पाच हजार रुपये लांबविला. याची किंमत एक लक्ष पन्नास हजार रुपये होती.उभयतांनी भद्रावती पोलिसात या प्रकाराची तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला. श्वानपथकाच्या व फिंगर प्रिंट पथकाच्या मदतीने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा भाग लागला नाही.या अज्ञात चोरट्यांचा तपास  भद्रावती पोलीस करीत आहे.