दहावी-बारावी परीक्षांबाबत मोठी घोषणा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    March 21, 2021
मुंबई:- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "सध्याची स्थितीनुसार येत्या परीक्षासाठी काही निर्णय घेतले आहेत. यांनुसार ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ मिळत होता. मात्र, आता ३० मिनिटे वाढवून देण्यात येणार आहे. तसेच, दिव्यांग विद्यार्थ्यांना २० मिनिटे वाढवून देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा या गृहपाठ पध्दतीने घेतल्या जातील. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून पाच ते सहा प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्याबद्दल माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल."

पुढे त्या म्हणाल्या की, "कला, वाणिज्य आणि व्यवसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर पंधरा दिवसात असायमेंट (स्वाध्याय) सादर करावे लागणार आहेत. यासाठी २१ मे ते १० जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे." पुढे कोरोनाचा धोका पाहता त्यांनी सांगितले की, "परीक्षा कालावधीत कोणी कोरोनाग्रस्त आढळून आल्यास लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परीक्षा किंवा सादर करण्यास १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात येणार आहे."

परीक्षा ऑफलाईन असल्याने सुरक्षेवरही त्यांनी काही निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. "सुरक्षेसाठी स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. परीक्षेदरम्यान प्रवासाची अडचण होऊ नये, म्हणून रेल्वेला विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरावे अशी विनंती केली. पालकांनाही यावेळी सूट देण्यात येणार आहे. तसेच, गर्दी टाळता येईल असे नियोजन करण्यात येणार आहे." असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दहावी-बारावी परीक्षांबाबत मोठी घोषणा.
           👇👇👇👇👇👇👇👇👇
1) दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार.

2) दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे या कालावधीत

3) बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार

4) विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा देता येणार.

5) विद्यार्थ्यांना परीक्षे दरम्यान कोरोनाची लागण झाल्यास जूनमध्ये विशेष परीक्षा होणार.

6) दहावी-बारीवीची प्रॅक्टीकल म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर होईल.

8)  विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव नसल्याने यंदा 80 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येईल.

9) दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखी पेपरसाठी 20 मिनिट  अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला आहे.

10) 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार