Click Here...👇👇👇

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपिपरी येथे पर्यावरण विषयावरचे विविध उपक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिपरी येथे जागतिक चिमणी दिन 20 मार्च, जागतिक वन दिन 21 मार्च, जागतिक जल दिन 22 मार्च, च्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पक्षी वाचवा अभियान अंतर्गत एक उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे आणि भरपूर उष्णतेमुळे हजारोच्या संख्येने पक्षी मरण पावतात याच अनुषंगाने महाविद्यालय पक्षी वाचवा अभियाना अंतर्गत अंतर्गत एक उपक्रम राबवितो. चिनी मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या प्रत्येक झाडांवर हे चिनी मातीचे भांडे बसवण्यात आले जेणेकरून महाविद्यालय परिसरात असलेले पक्षी पाणी पिऊन आपली तृष्णा भागवितात व त्यांना पाण्याकरिता इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. तसेच पुढील काही दिवसात उन्हापासून बचाव करण्यासाठी पक्षांसाठी छोट्या स्वरूपातील तीस घरटी बांधण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे, ही घरटी महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या वृक्षांवर असतील. तसेच जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन, जागतिक जल दिन च्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपापली मते इथे मांडलीत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.