🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा तलावात सापडला मृतदेह.

Bhairav Diwase. March 22, 2021
संग्रहित छायाचित्र....
मूल:- दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा तलावात मृतदेह सापडल्याची घटना तालुक्यातील 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे घडली. मृत युवकाचे नाव सुनील मानिक धुर्वे वय 27 वर्षे, रा. डोंगरगाव असे आहे. हा अविवाहित तरुण घरी न सांगता घरातून निघून गेला असता, आज दिनांक 22/3/2021 ला त्यांचे शव गावालगत असलेल्या तलावांमध्ये तरंगत असताना निदर्शनास आल्याचे गावातील व्यक्तींनी सांगितले.                           
    
     वडील आणि मृतक सुनील आणि त्याचा मोठा भाऊ मजुरी करून कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत असत. काही दिवसापासून सुनील विचार करीत असायचा असे घरच्यांनी सांगितले, मानसिक अवस्थेत दि. 20/3/2021 ला तो घरून निघून गेला. त्यामुळे घरच्यांनी सगळ्या नातेवाईकाकडे शोधाशोध केली. परंतु त्याचा कुठेही, कोणत्याही नातेवाईकाकडे पत्ता लागला नाही. म्हणून घरचे हतबल झाले. आज दोन दिवसानंतर दि. 22/3/2021 ला सुनील चे मृत शरीर गावालगत असलेल्या तलावामध्ये तरंगत असल्याचे काही शेताच्या कामावर जाणाऱ्यांच्या व्यक्तींच्या निदर्शनास आले. त्यांनी गावात घटनेची माहिती दिली. ते बघितल्या नंतर खात्री पटली. की मृतदेह सुनीलचा आहे. घरच्यांनी मूल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून शवविच्छेदनासाठी मूल येथे मृतदेह आणण्यात आले. मेजर श्रीधर मडावी यांनी तपास करून मृत देह अंत्यविधी करिता घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला? याविषयी शंका निर्माण केली आहे. मृत्यूचे कारण अजूनही समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात श्रीधर मडावी करीत आहेत.