Top News

जिवंत विद्युत वाहक तार तुटून लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान.

नुकसानग्रस्त शेतकर्‍याला आर्थिक मदत मिळवुन द्यावी; गावकऱ्यांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- तुलाना या गावातील मारोती टेकाम यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत खांबाचा जिंवत विद्युत तार तुटून शेतात असलेल्या तनशीच्या ढगावर पडला व त्यामुळे तनिस व शेतीचे अवजारे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
      
      महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून त्या शेतकर्‍याने वर्षभरासाठी गुंराच्या पोटापाण्यासाठी जमा केलेला चारा जळून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 
        
      जिवंत विद्युत वाहक तार तुटून लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान ती झालेच शिवाय गुरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असुन तहसीलदार राजुरा तसेच विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व सदर नुकसानग्रस्त शेतकर्‍याला आर्थिक मदत मिळवुन द्यावी अशी मागणी तुलाना येथिल गावकर्‍यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने