काम थांबवण्यासाठी तरुणांचे नगर परिषदला निवेदन.
कोरपना:- प्रभाग क्रमांक सहा येथे मोबाईल टॅावर उभारण्यात येत असले तरी आजूबाजू ला असणाऱ्या नागरिकांची कसल्याही प्रकारे चर्चा न करता नगर परिषद मधून कोणती हि परवानगी न घेता टॉवर उभारण्यात येत आहे 2019 / 20 ला याच तरुणांनी नगर परिषद ला तक्रार केली होती तेव्हा हे काम नगर परिषद ने बंद केले होते पण तेच काम आता पुन्हा चालू झाले टॉवर लागल्याने त्यातून निघणार्या रेडिएशन मुळे भविष्यात नागरिकांना, मुलाबाळांना मेंदूज्वर चा आजार होण्याची शक्यता आहे व जीवीत हानी होण्याची शक्यता आहे कोणतीही दुर्घटना झाल्यास नगरपरिषद गडचांदूर व टॉवर लावणारे हे जबाबदार असेल तरी तात्काळ टॉवर ची परवानगी रद्द करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी तरुण युवक अनुप मेश्राम
शंकर चापले, सागर मोहितकर, दशरथ डोंगरे, अरुण क्षीरसागर, निखिल मेंढी, शाहरुख खान, राजेंद्र मोहितकर, मनीष सलाम, महादेव हेपट, सतीश चकोर, अरविंद मेश्राम, शरद मेश्राम, दादाजी गेडाम, सुरेश गेडाम, विजय नवले, सुनील वांढरे रामचंद्र उरकुडे, विठ्ठल पिंपळकर, विजय सातपाडी, प्रेम बुरान, अश्विन टोंगे, विठ्ठल कोडापे, रमेश गेडाम, अब्राहम मोहितकर यांनी केली .
गडचांदुर नगरीत मनमानी कारभार.....
भाजपचे माजी नगरसेवक यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता स्वतःच्या इमारतीवर मोबाईल टॉवर लावले ते पण नगरपरिषद च्या बाजुला त्याचेच बघुन पुन्हा शेतकरी संघटनेच्या नगरसेविका यांचे पती यांनी पण आपल्या इमारतीवर कोनाच्या हि परवानगीची ची आवश्यकता नसल्याचे दाखवत त्यांनी पण मोबाइल टॉवर चे काम सुरू केलेे गडचांदुर शहरातील नागरिकांच्या जीवाचे काहीच मुल्य नाही असे आजी, माजी नगरसेवक व नगरसेवकांचे पती वागत आहे यांच्या बेजबाबदार कामा विरोधात प्रभाग ६ च्या युवांनी मांगण्या पुर्ण न झाल्यास व टॉवरचे काम न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशार नगर परिषद च्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष मुख्यधिकारी, याना निवेदनातून दिला