Top News

युवकाचा डागा माईन्स कोळसा खाणीच्या गड्ड्यात बुडून मृत्यू.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती परिसरातील बेलोरा (किलोनी) येथील रहिवासी असलेला पराग बंडू गाडगे ( वर्ष २२)  हा दिनांक १९ मार्च पासून  घरून बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसांत नोंद झाली होती. हा तरुण भद्रावती मध्ये औधोगिक प्रशिक्षण घेत होता दरम्यान १९ तारखेला आपले प्रशिक्षण आटोपून सरळ शेतात गेला अशी प्राप्त माहिती आहे. 

    त्यावेळी तो डागा माईन्स कंपनीने उखन्नामध्ये झालेल्या गड्ड्यामध्ये सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान शेताकडे गेला असता स्वतःची गुरे पाणी पाजताना तोल जाऊन पाण्यात पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला. 
 
       दरम्यान मुलगा घरी न परतल्यावर घरच्यांनी जवळपास दोन-तीन दिवस शोध घेतला असता. परंतु मिळून आला नाही दरम्यान दिनांक २२ मार्चला गावातील नागरिक नाल्यावर गेले असता प्रेत तरंगताना दिसून आले. याची माहिती भद्रावती स्टेशन ला तात्काळ  देण्यात आली. घटनास्थळी भद्रावती पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह  उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने