चंद्रपूर:- किरायाने गाडी घेऊन सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. यावेळी दहा चुंगड्यांतून २०० ग्रॉम वजनाच्या ४०० पाकिटे सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील तीन जण सराईत गुन्हेगार आहेत. करण मुन्ना समूद (२२) याच्यावर विविध प्रकारचे जवळपास ४० गुन्हे दाखल आहेत, तर असिफ शेख अष्टभुजा वॉर्ड याच्यावर मॅर्डर चोरी, मोहित उर्फ गोलू मेश्राम यांच्यावर तळीपाराचा प्रस्ताव प्रलंबित असून, विविध गुन्हे दाखल आहेत. यासह अन्य तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. चारचाकी वाहनातून गडचिरोलीवरून-चंद्रपूरकडे सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून वलणी फाट्याजवळ कारवाई करून दहा चुंगड्यांमधून तीन लाख आठ हजार रुपये किमतीच्या २०० ग्रॉम वजनाच्या ४०० पाकिटे सुगंधित तंबाखू जप्त करून सहा जणांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.