Top News

मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू.

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वेमार्गावरील घटना.
Bhairav Diwase.    March 09, 2021
चंद्रपूर:- रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 'गराडा' गावाजवळून जाणाऱ्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वे रुळावर मालगाडीची धडक झाल्याने नागझिरा अभयारण्यातील टी-१४ वाघिणीच्या नर बछड्याचा जागीच मृत्यू झाला. नागझिरातील पूर्व भागातुन गोंदिया चंद्रपूर ही रेल्वे लाईन जाते. अभयारण्याच्या लगत असल्याने वन्यजीवांचा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर असतो. घटनेचा पंचनामा केल्यानंतर वाघाचा अंतिम संस्कार करण्यात आला.
 
टी-१४ वाघिणीला तिनं बछडे होते. दुर्घटनेत एका बछड्याचा मृत्यू झाला असून एक बछडा जखमी झाल्याचं कळत आहे. टी-१४ वाघिण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ह्या भागात विचरन ( टेरोटेरी) क्षेत्र स्थापित केलेली आहे. सदर बछडे सहा ते आठ महिन्याचे आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने