Click Here...👇👇👇

चिंतामणी महाविद्यालयात विद्यापीठ पदवी वितरण समारंभ संपन्न.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.     March 07, 2021
पोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे दिनांक 06/03/2021 रोज शनिवार ला पदवी वितरण समारंभ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण सर होते. तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. गुल्हाने सर चिंतामणी वाणिज्य महाविद्यालय पोंभुर्णा  तसेच प्रमुख मार्गदर्शक प्रा.सोनुने चिंतामणी वाणिज्य महाविद्यालय पोंभुर्णा हे होते. 

      या कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली. 29 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरवाडे मॅडम यांनी केले. प्रा. डॉ. शैलेंद्र गिरीपुंजे यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. मनोहर गुडधे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गुडधे  यांनी केले तर आभार प्रा. विठ्ठल चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.