Top News

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यासह भद्रावती शहरातही वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भद्रावती नगर परिषदेने कंबर कसली असताना नागरिक कोरोना नियमांचे  कसे उल्लंघन करीत आहेत याचा प्रत्यय दि.५ मार्च रोजी सुज्ञ नागरिकांना आला. 
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भद्रावती शहरातील व्यापारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय भद्रावती व्यापारी असोसिएशन आणि नगर परिषदेने मिळून घेतला. त्यानुसार सुरुवातीला दर शुक्रवारी शहरातील व्यापारपेठ कडकडीत बंद राहत होती. तसेच पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून 'माझी वसुंधरा' अभियाना अंतर्गत 'नो व्हेहीकल डे' दर शुक्रवारला पाळायचा नियम ठरविण्यात आला. मात्र दि.५ मार्चच्या शुक्रवारचा अनुभव काही वेगळाच आला. शहराच्या मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने चालू होती. तर येथील गांधी चौकातील एका आईस्क्रीम व दुध डेअरीच्या दुकानात चक्क मागच्या दारातून सामान विकला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ज्यांच्या घरीच  दुकान आहे, त्यांनी मागच्या दाराने  सामान विकायचा आणि पैसे कमवायचे. मग आमची घरे आणि दुकाने दुर-दुर असल्यामुळे आम्ही कोणते पाप केले? असा सवाल प्रामाणिकपणे दुकान बंद ठेवणारे दुकानदार विचारत आहेत. तर नो व्हेईकल डे असताना सर्रास दुचाकी आणि चारचाकी वाहने धावताना दिसून आली. त्यामुळे नागरिक न.प.ला किती सहकार्य करतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने