Top News

भद्रावतीच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या विविध पदांवर महिलांची निवड.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दलाच्या भद्रावती शाखेच्या विविध पदांवर शहरातील महिलांची निवड करण्यात आली. परिषदेच्या वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष पदावर आमिषा रंगारी यांची, भद्रावती शहर संपर्क प्रमुख पदावर कु. रीया पथाडे, भद्रावती तालुका महामंत्री पदावर स्नेहा दत्ता, तर भद्रावती शहर उपाध्यक्ष पदावर शिखा दास, यांची निवड करण्यात आली आहे. 
    
       परिषदेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे देवून  या सर्वांची नियुक्ती केली आहे. वरीष्ठाशी तथा इतर पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवून परिषदेची कार्य करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.या सर्वांच्या नियुक्तीमुळे परिसरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्याला वेग येईल असा विश्वास यावेळी वरिष्ठांकडून व्यक्त करण्यात आला.या नियुक्तीबद्दल किरण रंगारी, कविता दास, कमला पाल, दिया लांडे, देवकी शेंडे, अवंतीका  पुडके, रेखा बाला, विना मंडल, अंजना पाल, अमृता रॉय, दिव्या वाटेकर व इतरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने