शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.       March 02, 2021
सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथील शेतशिवारात कडूलिंबाच्या झाडाला गळफास लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवार सायंकाळी उजेडात आली. उरकुडा केशव ठिकरे (६५) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. अंतरगावपासून काही अंतरावर असणाऱ्या शेतशिवारात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत इसम आढळून येताच गाव परिसरात खळबळ उडाली. नवरगाव पोलिसांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले  आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आहे. मुलीचे लग्न झाले आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)