अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनीचा मुजोर पणा कायम?

अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनी नेहमी वादाच्या भोवऱ्यात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:-  गडचांदूर शहरातील अल्ट्राटेक उद्योग समूहाच्या युनिट माणिकगड सिमेंट कंपनीचा संधीसाधू , हेकेखोर आणि खरा निर्लज्ज चेहरा आता समोर येत आहे कारण  कामगार जिवनदास दशरथ काटवले हे कंपनीचे स्थाई कामगार असल्याने त्यांना कंपनी कडून निवासस्थान दिले होते पण दोन वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये काटवले यांचा नैसर्गिक आजारामुळे मृत्यू झाला होता तेव्हा कंपनी प्रशासन आणि माणिकगड सिमेंट कंपनीचे कामगार संघटनेचे अध्यक्ष बि. डी.सिंग यांनी जिवनदास काटवले यांच्या पत्नी शारदा काटवले यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम देण्याचे आश्वासन दिले होते पण दोन वर्षांपासून संबंधित अधिकारी आणि माणिकगड सिमेंट कंपनीचे कामगार संघटनेचे अध्यक्ष बि. डी. सिंग यांनी कंपनीने दिलेल्या स्थानिक निवासस्थानातून हाकलून देण्यात आले आहेत आणि शारदा काटवले यांना देण्यात येणाऱ्या कामावर परप्रांतीय महिला किरण श्रिवास्तव हिची नियुक्ती करण्यात आली असून तिच्या पतीने सात ते आठ वर्षापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यामुळे किरण श्रिवास्तव ही आपल्या मुळं गावात राहत होती पण जेव्हा कंपनीच्या दवाखान्यातील एक जागा रिक्त झाल्या बरोबर सिमेंट कंपनीच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष बि.डी. सिंग याने किरण श्रिवास्तव हिला परराज्यातून आणले व आपल्या घरात ठेवून आणि आपल्या पदाचा वापर करून संबंधितांवर दबाव आणून किरण श्रिवास्तव हिला कंपनीच्या दवाखान्यात कामं देण्यात आले आहे किरण श्रिवास्तव ही अशिक्षित असल्याने सुध्दा काम दिले तर शारदा काटवले हि बारावी उत्तीर्ण असून सुद्धा त्यांना कंपनी काम देण्यात असमर्थता का दाखवत आहे? शारदा काटवले यांना दोन मुले असून त्यांच्या शिक्षणासाठी साठी लागणारा खर्च, सासू सासरे असून सासऱ्याला लकवा मारला असून औषधींचा खर्च, हक्काचं घर नाही त्यामुळे घराचं भाडे तत्वावर असल्याने त्यांना कामाची नितांत आवश्यकता आहे त्यामुळे कंपनीच्या प्रशासनाला खूप निवेदने देण्यात आली होती आता तरी सिमेंट कंपनीच्या प्रशासनाने शारदा काटवले यांच्या निवेदनाची दखल घेऊन कामवार घेण्यात यावे अशी मागणी आहे.
 


       गणेश वैरागडे हे माणिकगड सिमेंट कंपनीच्या जि.एल.पाठक या ठेकेदाराकडे विस ते बावीस वर्षांपासून कंपनीमध्ये काम करत होते पण काही नैसर्गिक आपत्तीमुळे कमरेला मार लागला होता तेव्हा पासून त्यांना चालण बसणं होत नव्हत दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती तरीही प्रकृती गंभीर असल्याने ठेकेदार पाठक यांनी गणेश वैरागडे यांच्या पत्नी संगीता गणेश वैरागडे यांना कामावर घेण्यात आले होते यावेळी कंपनीच्या अतिथी गृहात काम देण्यात आले होते मात्र बाई माणूस असून सुद्धा कामावरचा मुकादम अशोक सामल याने हेतूपुरस्सर दुपार पाळीला बोलवायचा जी दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत असते तर याही परिस्थितीत काम करीत असताना सुध्दा सात दिवसांत कामावरून काढून टाकले होते तर गणेश वैरागडे यांच्या आजारांमुळे मृत्यू झाला होता तेव्हा पासून संगिता वैरागडे ह्या एका मुलाला घेऊन कसेबसे जीवन कंठत आहेत म्हणून त्यांना  कंपनी कडून काम देण्यात यावे.
         
     दोन्ही प्रकरणांत परीस्थिती काही प्रमाणात सारखीच असल्याने अल्ट्राटेक उद्योग समूहाच्या युनिट माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रशासनाने दोन्ही संबंधित कर्मचारी अशोक सामल आणि कामगार संघटनेचा अध्यक्ष बि. डी. सिंग यांच्या वर कारवाई करण्यात यावी आणि शारदा काटवले आणि संगिता वैरागडे कामावर रुजू करण्यात यावी अशी मागणी दोन्ही संबंधित महिलांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने