Top News

नारंडा येथे कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात.

नारंड्याचे माजी सरपंच वसंतराव ताजने लसीचे प्रथम लाभार्थी.
Bhairav Diwase.      March 11, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  कोरोनाच्या लसीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या लसीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यावेळी नारंडा येथील जेष्ठ नागरिक,माजी सरपंच वसंतराव ताजने यांना पहिले लसीकरण देण्यात आले.तसेच दुसरी लस सुरेश मालेकर यांना देण्यात आली.सदर लसीचा ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात फायदा व्हावा या दृष्टीने सदर लसीकरणाला सुरवात करण्यात आलेली आहे.प्रथम टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे.व सदर लसीकरण हे मोफत उपलब्ध करण्यात येत आहे.तसेच सदर लसीकरण अतीशय सुरक्षित असून ग्रामीण भागातील जनतेसाठी विशेषकरून लस उपलब्ध करण्यात आलेली आहे.या लसीकरणाचा जास्तीत जास्त प्रमाणात परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागानी केलेले आहे.यावेळी नारंडा येथील अनेक जेष्ठ नागरिकांना लसीकरण देण्यात आले.नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व गुरुवारला जेष्ठ नागरिकांनी आपले आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे अशी माहिती वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे यांनी दिली आहे.
    
        यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथे कोविड -19 लसीकरणचे  उदघाटन जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपसभापती  सिंधुताई अस्वले, गटविकास अधिकारी पाचपाटील साहेब, महिला बालविकास अधिकारी जाधव डॉ.  नारंड्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ. स्वप्नील टेम्भे, डॉ. खोब्रागडे, डॉ. ताकसांडे,पोलीस पाटील नरेश परसुटकर, प्रवीन हेपट व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने