Top News

गडचिरोली पोलिसांचा नक्षल्यांवर "सर्जिकल स्ट्राईक".

छत्तीसगड सीमेवरील शस्त्र कारखाना उध्वस्त.
Bhairav Diwase.     March 06, 2021
गडचिरोली:- छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांच्या सी 60 पथकाला मोठं यश आलं आहे. छत्तीसगड सीमेपासून 4 ते 5 किमी आत छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे नक्षलींचा हा शस्त्र कारखाना नक्षलींचा गड मानला जाणाऱ्या अबुझमाड भागात होता. त्यामुळे एकाप्रकारे वाघाच्या जबड्यात घुसून गडचिरोली पोलिसांच्या सी 60 दलाने त्याचे दात पाडले आहे, असा पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे. काल 5 मार्च रोजी ही कारवाई केल्याची माहिती आहे.

गडचिरोलीत पोलिस - नक्षल्यांमध्ये चकमक, १ जवान जखमी.


दरम्यान या घटनेत सी 60 दलाचा एक जवान जखमी झाला आहे, इतर जवान सुरक्षित आहेत. मार्च ते मे महिन्यादरम्यान नक्षलींचा टीसीओसी म्हणजेच टेक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन असते.

त्याकाळात नक्षली सीमा ओलांडून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे यंदा सी 60 पथकाने अॅडिशनल एसपींच्या नेतृत्वात नक्षलींचा टीसीओसीला आळा घालण्यासाठी काऊंटर ऑपरेशन राबवले होते. त्याच दरम्यान नक्षलींचा शस्त्र कारखाना अबुझमाड परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.


त्यानंतर सी 60 पथकाने तो कारखाना उध्वस्त केला आहे. 48 तास हे ऑपरेशन सुरू होते. या दरम्यान 3 वेळा गोळीबार / चकमकी झाल्या. ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या गडचिरोली पोलिसांच्या मदतीसाठी आज गडचिरोली पोलिसांचा हेलिकॉप्टर आणि हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी आधी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांची त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. या अभियानादरम्यान एक जवान जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नक्षलविरोधी उत्कृष्ट कारवाई करणाऱ्या जवानांचे पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन केलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने