चंद्रपूर:- राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली. वडेट्टीवार हे सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात होण्याचा सल्ला दिला आहे.
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण.
शुक्रवार, मार्च ०५, २०२१