टेकाडी येथे महिला सक्षमीकरण दिन उत्साहात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.     March 28, 2021
मुल:- मुल तालुक्यातील टेकाडी गावात महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत सार्थक ग्राम संघ तर्फे महिला सक्षमीकरण दीन उत्साहात साजरा करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षाताई बल्लावार यांनी तर सूत्र संचालन युवा कार्यकर्ता ओमदेव मोहुरले यांनी केले त्यावेळी उद्घाटक म्हणून सोनियाताई गदेवार, सह उद्घाटक ग्रामसेविका  वानिताताई कोडपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच सतीश चौधरी, उपाध्यक्ष  प्रमोद बोमंनवार पोलीस पाटील , हे तर गडमवार, वर्षाताई बल्लावार, तेजस्विनी सातपुते, प्रतिभाताई मडावी, अल्काताई उईके, आदी प्रमुख मार्गदर्शन केले.
          
       त्यावेळी मनिषाताई बोमनवार, किरण ताई चौधरी, लीनाताई गोवर्धन, गणपती जराते, अमितराव घडसे, सीमाताई गोवर्धन, सह गावातील आधी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.