(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील मेन रोडवरील एका दुकानात घडला. एका लहान मुलीने त्या दुकानातून शालेय साहित्य विकत घेतले व दुकानदाराला ५० रुपयांची खेळण्यातील नोट दिली. त्या दुकानदाराने ती नोट रंगाने खऱ्या नोटेसारखी असल्याने व आकारानेही जवळपास सारखीच असल्याने आपल्या गल्ल्यात ठेवून दिली. तीच नोट दुसऱ्या दिवशी एका ग्राहकाला दिली असता ती नोट मुलांच्या खेळण्यातील नकली नोट असल्याचे लक्षात आले. त्या ग्राहकाने त्या दुकानदाराला ती नोट परत केली व खरी नोट मागितली. त्या दुकानदाराने नोटेचे निरीक्षण केले असता त्या नोटेवर 'चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया' आणि 'फूल ऑफ फन' असे लिहिलेले आढळून आले. त्यामुळे दुकानदाराचे ५० रुपयांचे नुकसान झाले.
सध्या १०, २०, ५०, २००, ५००, १०००, २०००० च्या अशा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या नकली नोटा बाजारात असून, त्या स्वीकारताना काळजीपूर्वक पाहणे आवश्यक