मुल:- प्रेयसीला रंग लावल्याचे कारणावरून दोन प्रेमविरामध्ये फ्रिस्टाईल झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी मुल येथील रेल्वे स्टेशनवर घडली. "एक फुल दो माली" या कथानकात तीन शिक्षकांनी हस्तक्षेप केल्याने रंगलेली फ्रीस्टाईल थोडक्यात थांबली. नवीन रेल्वे स्टेशन मागील परिसरात राहणाऱ्या एका मूलीला घराशेजारी राहणाऱ्या अभयने "बुरा न मानो होली है" म्हणत अनेकांसमोर चेहऱ्याला रंग लावला. अभयने मूलीला रंग लावल्याची घटना पाहणाऱ्या श्रीकांतने सदरचा प्रकार सुहासच्या कानावर घातला. श्रीकांत कडून तीला रंग लावल्याची माहिती होताच सुहास कावराबावरा झाला. कावरा बावरा झालेल्या सुहासने श्रीकांतला संध्याकाळी अभयला रेल्वे स्टेशनवर घेवून येण्यास निरोप दिला.
सुहासच्या निरोपाप्रमाणे शेजार मित्र असलेला श्रीकांत अभयला घेवून रेल्वे स्टेशनवर गेला. त्यापुर्वीच रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला सुहास तीन मित्रांसोबत अभयची वाट पाहत बसून होता. अभयाला घेवून श्रीकांत सुहासकडे गेला तेव्हा सुहासने अभयला त्या मूलीला रंग का लावलास. अशी विचारणा करीत ती माझी प्रेयसी आहे. पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर याद राख. म्हणत अभयला दमदाटी देवू लागला.