कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भाजयुमोची वृद्धाश्रमात अशीही होळी व रंगपंचमी साजरी.
बल्लारपूर:- महाराष्ट्रात पुन्हा डोकं वर करत असणाऱ्या कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची होळी ही साधेपणाने साजरी करावी, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थितीचे सिंहावलोकन करून सामाजिक दायित्व जोपासत एखादं समाधानी उपक्रम यंदा राबविण्याच्या मानस भाजयुमोने समोर ठेवला. त्यानुसार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज बल्लारपूर शहरानजीकच्या मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन येथील वृद्धांना फळ व सॅनिटायझरचे वाटप केले.
याप्रसंगी, भाजयुमोचे जिल्हा सोशल मीडिया संयोजक आदित्य शिंगाळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अभिषेक सतोकर, पियुष मेश्राम व अभिषेक सातारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.