Click Here...👇👇👇

जनावरांसाठी तनिस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग.

Bhairav Diwase
विद्युत खांबाला धडक दिल्याने जिवंत विद्युत तारांचा स्पर्शाने लागली आग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- जनावरांसाठी तनिस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर नि विद्युत खांबाला धडक दिल्याने जिवंत विद्युत तारा ट्रॅक्टरला स्पर्श होताच आग लागली. ग्रामस्थानी लगेच मिळेल त्या साधनांनी आग विझवली थोडक्यांत जीवित हानी झाली नसली तरी तनिस मात्र पूर्णतः जळाले. ही घटना राजुरा तालुक्यातील सुब्बई या गावात काल सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
        सुब्बई येथील महेंद्र चापले यांचे मालकीचे ट्रॅक्टरनी दिलीप बुडे यांच्या शेतातील तनिस घेऊन गावात येत होते. गावात प्रवेश करताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्युत खांबाला ट्रॅक्टरची धडक बसली. त्यामुळे जिवंत विद्युत तारांचा ट्रक्टर मधील तनिसला स्पर्श झाल्याने आग लागली. ही घटना गावाला लागूनच घडल्याने हे लक्षात येताच ग्रामस्थानी धाव घेत मिळतील त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच राजुरा येथील अग्निशमन वाहनास कळविण्यात आले. तोपर्यत ग्रामस्थानी ती आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला, सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी मात्र वित्त हानी झाली आहे.