भद्रावती पंचायत समितीतील 'डेमो हाऊस' चे भूमिपूजन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कमीत कमी जागेत घरकुल कसे सुंदर बसवायचे याचा लाभार्थ्यांना आदर्श ठरणा-या येथील पंचायत समितीच्या आवारातील 'डेमो हाऊस' चे भूमिपूजन सभापती प्रवीण ठेंगणे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

       याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, पशूवैद्यकीय अधिकारी डाॅ.शेख, पंचायत विभाग विस्तार अधिकारी पारखी आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना २७० चौ.फू.जागेत घरकुल बांधायचे असते. तेवढ्याच जागेत सुसज्ज घरकुल बांधण्याकरीता ग्रामस्थांना मार्गदर्शन मिळण्याकरीता या 'डेमो हाऊस' चा उपयोग होणार आहे. या डेमो हाऊसचे बांधकाम ४५ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.