Top News

दुचाकीची बैलबंडीला धडक; दोघे जागीच ठार.


Bhairav Diwase. March 11, 2021
संग्रहित छायाचित्र.....
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही गावाजवळ दुचाकीने बैलबंडीला धडक दिल्याने दुचाकीस्वारासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना दि. 10 मार्चला साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. क्रीशना आबाजी बोभाटे व अमीर जराते दोघेही रा. अमिर्झा ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी आहेत.

मृतक हे आपल्या गावाकडे वांद्रा येथून बांधकामाचे काम आटोपून गावाकडे जात असताना तुळशीदास भागडकर हे आपल्या शेतावरून बरडकीनही गावाकडे शेतमाल घरी नेत होते. त्यांच्या बैलबंडीला दुचाकी चालकाने धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह मागे बसलेला सोबती जागीच ठार झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने