परिचारिकेशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. March 11, 2021
कुरखेडा:- कुरखेडा येथील एका खासगी दवाखान्यात एका परिचारिकेशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. पुंडलिक मोतीराम निपाने वय (६१) रा. कुरखेडा असे संशयित आरोपीचे नाव आहे.

निपाने याच्‍या कुरखेडा येथील इमारतीमध्‍ये एक खासगी दवाखाना आहे. येथे कार्यरत असणार्‍या परिचारिकेशी निपाने याने असभ्य वर्तन केले. तिच्या तक्रारीवरुन मंगळवारी कुरखेडा पोलिस ठाण्यात निपानेविरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भंवर करीत आहेत.