Top News

सकमुर सरपंच रमाई योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांची अडवणूक करीत असल्याचा आरोप. बीडीओकडे तक्रार.

Bhairav Diwase.    March 10, 2021


गोंडपिपरी:- सकमुर येथील सरपंच रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या काही लाभार्थ्यांची आकसबुद्धीने अडवणूक करीत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. यासंदर्भात बीडीओ कडेही तक्रार करण्यात आली आहे.

                       गोंडपिपरी येथील संदीप हॉटेल मध्ये  घेण्यात आलेल्या (दि 10मार्च )पत्रपरिषदेत सांगण्यात आले की ,2018-19मध्ये रमाई आवास योजनेंतर्गत आहे अनुसूचित जातीच्या एकूण 26लाभार्थ्यांना घरकुलासाठी रीतसर  पात्र ठरवण्यात आले .यापैकी शामराव लिंगू झाडे ,विजय अलोणे ,पतृ दहागावकर ,भीमराव कोरडे ,इंदिराबाई बोरकुटे ,श्री हरी अलोणे या सहा लोकांची सरपंचाकडून अडवणूक करण्यात येत आहे .त्यांच्या घरकुलाच्या फाईलीवर सह्या करन्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
                         
    या लोकांनी यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे .मात्र यासंदर्भात त्यांच्याकडे काहीही ठोस पुरावा नाही .नमुना 8 वर वा अन्य कुठल्याही ग्रामपंचायत रेकॉर्डवर वरील लोकांना  घरकुलाचा लाभ मिळाल्याची नोंद नाही . आकसबुद्धीने वरील सहा लाभार्थ्यांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला .यासंदर्भात गट विकास अधिकारी यांच्याकडे पीडित लाभार्थ्यांनी तक्रार नोंदवली आहे .
                      
        सदर पत्रपरिषदेला संतोष मुगलवार ,सौ कोमल संतोष मुगलवार ,जीवन अलोणे या ग्रामपंचायत सदस्यांसह साईराज अलोणे ,किशोर घुबडे ,पतृ दहागावकर ,विजय अलोणे ,जीवन गोंगले ,संतोष तोरडवार ,भीमराव कोरडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने