Top News

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच जवान शहीद; IED स्फोटकांनी उडवली बस‌.

Bhairav Diwase.      March 25, 2021


छत्तीसगड:- छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांची बस स्फोटकांनी उडवून दिली. या भीषण हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत तर १४ जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी सलग तीन IED चे स्फोट झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अवस्थी यांनी सांगितलं.

नक्षलविरोधी मोहिमेचे डीजी अशोक जुनेजा यांनी सांगितलं की, "नाराणयपूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिम सुरु होती. यावेळी डीआरजीचे जवान मोहिमेवरुन बसने संध्याकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास परतत होते. याचवेळी एका पूलावर तीन IED स्फोट झाले. स्फोटामुळे बसचा चालक आणि दोन जवान जागेवरच ठार झाले. तर दोन जवानांचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला."


या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा बलाला घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने