Top News

अवैधरित्या गांजा तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक.

Bhairav Diwase. March 25, 2021
कुरखेडा:- कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या एक-दीड किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील शेतशिवारात गांजाची शेती करणाऱ्या एका शेत मालकासह गांजाची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना कुरखेडा पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहाथ पकडून अटक केली आहे. पुंडलिक मुंगसू कसारे वय 65 रा. आजाद वार्ड ,कुरखेडा असे शेत मालकाचे तर सौरव संतोष डहाळे वय 20 वर्ष व रितिक राधेश्याम मच्छिरके वय 20 वर्ष दोघेही रा.चिखली असे आरोपींची नावे आहेत.

      पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नजीकच्या वाकडी येथील शेतशिवारातील एका शेतामध्ये गांजाची लागवड केली असून तेथून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वरून पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख उपविभागीय पोलिस अधिकारी जय दत्त भवर यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलिसांनी धाड टाकून शेत मालकासह दोन युवकांना रंगेहात पकडले यावेळी केलेल्या कारवाईत आरोपीकडून 52 किलो 900 ग्रॅम वजनाचा ओला गांजा किंमत 2 लाख 64 हजार 500 रुपये वय एक दुचाकी किंमत अंदाजे 25 हजार असा एकूण दोन लाख 89 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एनडीपीएस 1985 चे कलम 8 (क)20 (अ)(ब)(क), 22 (क) नुसार गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली या कारवाई दरम्यान पोलीस ठाणेदार सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे पोलीस हवालदार मानकर,बारसागडे, जांभुळकर ,पोलीस शिपाई ललित मेश्राम, मनोहर पुराम, महिला पोलीस शिपाई अश्विनी रामटेके यांचा सहभाग होता गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने