RFO दिपाली चव्हाण यांची गोळ्या झाडून आत्महत्या.


Bhairav Diwase.    March 26, 2021
अमरावती:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत RFO (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून केलेल्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य जीव परीक्षेत्रात त्या गेल्या दीड वर्षापासून RFO (वनपरिक्षेत्र अधिकारी) या पदावर कार्यरत होत्या. आज सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी उघड होताच परिसरात खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याच विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांना त्रास देत असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळेच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. दीपाली या गर्भवती होत्या, त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात अनेक आत्महत्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच आणखी एका महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येची बाब समोर आली आहे. आर्थिक अडचणींबरोबरच अनेक कारणांमुळे गरीबांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंत अनेक आत्महत्येच्या घटनांमुळे देश हादरला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने