राजुरा:- तेलंगणा -महाराष्ट्र सीमेवरील असिफबाद कडून येणाऱ्या सिमेंट टँकर चालकाच्या अनियंत्रित मुळे तेलंगना-चंद्रपूर असिफबाद- महामार्गातील लक्कडकोट येथील वन विभागाचे तपासणी नाक्याला जबर धडक दिल्याची घटना काल रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली.
धडक इतकी जबर होती की तपासणी नाक्याची तोडफोड करीत ते ट्रक गेल्याने वन विभागाचे तपासणी नाक्याची मोठे नुकसान झाले. सुदैवाने येथे कार्यरत वन कर्मचारी लघुशंकेसाठी गेले आणि अशी घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. घटनेची माहिती मिळताच लक्कडकोट येथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले.