भाजयुमोचे तहसीलदारांमार्फत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन.
बल्लारपूर:- सद्यस्थितीत राज्यात पुन्हा उफाळून येत असलेली कोरोणाची लाट लक्षात घेता राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढवेल अशी भीती सदृश स्थिती निर्माण झालेली आहे.
अश्यात, शाळा महाविद्यालयांकडून विद्यार्थांना मागविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती व अन्य संबंधित अर्जांची मुदत संपते आहे. परंतु येथे नमूद उक्त स्थिती बघता, विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण आहे. शिवाय जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हे कोरोणा पॉझिटिव्ह आढळल्याने सदरहू फार्म भरण्यासाठी ते जावू शकत नाही. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच अशा जीवघेण्या परिस्थितीतून त्यांना सुकर मार्ग मिळावा यासाठी शिष्यवृत्ती तसेच फी-माफीचे ऑनलाईन फार्म भरण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुदतवाढ द्यावी, अशी मागणी घेऊन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मा. तहसीलदार बल्लारपूर यांचेमार्फत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदन केली आहे.
यावेळी, भाजयुमो सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाळे, पियूष मेश्राम यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.