Top News

चंद्रपूर जिल्ह्यातून धावणार्‍या प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्या.

भाजयुमोचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी साधारणतः वर्षाआधी देशभरात कडक लॉकडाऊन लागु करण्यात आला होता, त्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. पुढे टप्प्याटप्प्याने ऑनलाॅक होत बंदावस्तेत असलेली प्रवासी रेल्वेसेवा काही भागांत सरकारने सुरू केली. परंतु चंद्रपूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून धावणार्‍या प्रवासी रेल्वे गाड्या अद्याप बंद आहेत. याचा फटका सामान्य प्रवाशांपासून तर तत्संबंधी उपजिविका करून पोट भरणाऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे जिल्ह्यात धावणाऱ्या बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर, भाग्यनगर एक्सप्रेस, नागपूर पॅसेंजर आणि रामगिरी पॅसेंजर या प्रवासी रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्या. ही मागणी घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. 

          जिल्ह्यातील रेल्वेसेवा बंद असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असून एसटीच्या महागड्या प्रवासाने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो आहे. यासोबतचं रेल्वे वर पोट असणारे स्थानकावरील छोटी दुकानदारे, ऑटोचालक, हमालबांधव, तसेच रेल्वे प्रवास करून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी इ. सर्वांवर प्रचंड आर्थिक त्राण बसलेला आहे. शिवाय वर्षभरापासून रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळही आली आहे. त्यामुळे या रास्त प्रश्नावर आपण मा. रेल्वेमंत्र्यांना पत्रव्यवहार करून पाठपुरावा घ्यावा. आणि सदरहू रेल्वेसेवा सुरू करण्यासंदर्भात लवकरचं योग्य निर्णय घेऊन जिल्ह्यातील प्रवासी रेल्वे चालू करण्यात याव्या. अशी चर्चाही याप्रसंगी भाजयुमोच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांचेशी भेटीदरम्यान केली. 
           यावेळी या शिष्टमंडळात, भाजयुमो सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, हितेश गाडगे, मंगेश मादेशवार, राहुल कावळे यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने