Top News

उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय, की त्यांच्यावर 'राज्य' आलंय.


Bhairav Diwase.      April 06, 2021
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये सोमवारी कोरोनाच्या उपाययोजनांबाबत व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे चर्चा केली. या चर्चेची माहिती मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंत्र्यांच्या राजीनाम्यांमुळे राज्य सरकारची होणाऱ्या बदनामीवर राज ठाकरे यांनी भाष्य केले. "उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय, की त्यांच्यावर 'राज्य' आलंय", असा चांगला विनोद मला कोणतरी पाठवला असल्याचे सांगून राज यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली.
 
 
राज्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यात आला. सोमवारी या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे चर्चा झाली. त्यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना दिल्या. यासंबंधीची माहिती पत्रकारपरिषदेत देताना राज म्हणाले, "महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य असल्याने बाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. ज्यावेळी लाॅकडाऊननंतर परप्रांतीय लोक आपल्या राज्यांमध्ये परतले होते, तेव्हा मी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये हे लोक पु्न्हा महाराष्ट्रात आल्यास त्यांची मोजणी करुन कोरोना चाचणी करावी, अशा काही मागण्या होत्या. मात्र, राज्यसरकारने त्याकडे दुर्लक्ष केले". सोबत निवडणूका असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होत नसल्यामुळे तिथे कोरोनाची दुसरी लाट दिसत नसल्याचे राज म्हणाले.
 
महाराष्ट्रातला नागरिक घरामध्ये अडकून पडतोय, हे चांगले नाही. तसेच विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांची हाल होत आहेत, हे देखील योग्य नसल्याचे राज यांनी सांगितले. माध्यम कर्मचाऱ्यांनी देखील सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. किंबहुना शब्द वापरु ना ? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोलाही लगावला. राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केले. "उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलायं, की त्यांच्यावर 'राज्य' आलंय", असा राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर कालच मला कोणतरी चांगला विनोद पाठवला असल्याचे सांगत, त्यांनी मिश्किलपणे उद्धव ठाकरे यांची राज्य सांभाळताना होणारी तारांबळ अधोरेखित केली.
 
 
 
राज यांनी उद्धव ठाकरेंना केलेल्या सूचना

१) लघुउद्योजकांना आठवड्यातून दोन-तीन दिवस दुकाने उघडून विक्री करण्याची मुभा द्यावी.

२)  सामान्यांना बॅंकेच्या हफ्ते भरण्याबाबत हो राज्यसरकाराने निर्णय घ्यावा, सूचना द्यावी

3) वीजबील माफ करणे, लाॅकडाॅऊनच्या काळात. व्यावसायिकांना 50 टक्के जीएसटी किमंतीत सूट द्यावी. त्यासाठी केंद्राशी बोलून घ्यावी. समाजमन कोसळले आहे

4) कंत्राटी कामगारांना राज्यसरकारांना कामावर घेतले होत. त्यांना काढून टाकलं होत. त्यांना कायमस्वरुपी करुन घ्यावी

5) सलून - जीम यांना आठवड्यातून दोन तीन वेळा उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी

6) सराव करणाऱ्या खेळाडूंना सवलत मिळावी, त्यांना परवानगी मिळावी

7) शेतकरी हमीभावामध्ये सूट

8) शाळा बंद मात्र त्यांची फी घेणे सुरू आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावी. कर्मचाऱ्यांचाही पगाराचा विचार करावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने