Top News

त्या वृध्द आई व अपंग मुलाचा मृत्यू कोरोनामुळे?

वरोरा येथे आढळले मायलेकाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- वरोरा  येथील यात्रा वार्ड परिसरात राहणाऱ्या वृध्द आई व अपंग मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (9 एप्रिल 2021) ला घरीच आढळून आला होता. दरम्यान त्यांचा मृत्यू हा उपासमारीने झाला असावा असा संशय होता. मात्र कोरोना संसर्गाची भिती असल्याने वरोरा येथील वैद्यकीय विभागाने दोघांचीही कोरोना चाचणी केली असता दोघेही पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

वरोरा शहरात आई-मुलाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत. 

          वरोरा शहरातील यात्रा वार्ड परिसरात 80 वर्षीय वृध्द महिला व 50 वर्षीय अपंग मुलगा यांचे घर आहे. शिवाय त्यांना एक मोठा मुलगा आहे. परिस्थित अत्यंत हलाखीचे असल्याने कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठा मुलगा हा मुंबई येथे कामाकरिता गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी जाण्याअगोदर आपल्या आई व भावाची जेवणाची व्यवस्था जवळच असलेल्या एका खानावळी मध्ये करून ठेवली होती. आई सेाबत असलेला लहान मुलगा हा जन्मजात पोलिओग्रस्त असल्यामुळे डबा आणण्याकरिता आई स्वत: जात असे. वृध्द आई ही आजारी पडल्याने ती 3 दिवसांपासून खानावळीत डबा घेण्यासाठी गेली नाही. डबा घेण्यासाठी गेली नसल्याने त्यांच्या घरी चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. घरात प्रवेश करून पाहिले असता दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. दोघांचाही मृत्यू हा उपासमारीने झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. 
          
     याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. कोरोना विषाणूची सर्वत्र भिती असल्याने वरोरा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आले. दोघांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असून वृध्द आई व मुलगा दोघेही नमुने पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती सुत्रांची दिली आहे. दोघेही मायलेकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने