चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते सध्या गृह विलीगिकरणात आहे. ही माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आमदार भांगडीया यांनी संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला असून सर्वांनी सुरक्षित रहावे अशी विनंती केली आहे.