क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार घराघरात पर्यंत पोहोचणार:- अजय दुबे

Bhairav Diwase

Bhairav Diwase.       April 11,2021
बल्लारपूर:-  दि.11/04/2021 ला बल्लारपूर शहरातील भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडीच्या कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी, प्रदेश कामगार आघाडीचे सरचिटणीस अजयभैय्या दुबे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, कैलाश गुप्ता, रिंकू गुप्ता, मनीष रामिल्ला, श्रीकांत उपाध्याय, यांसह आदी मंडळी उपस्थित होते.