(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीनिमित्य रविवारी चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर म्हणाल्या नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व महात्मा जोतिबा फुले होते. स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे, एकमताने सत्यवर्तन करून राहिले पाहिजे, असे त्यांचे विचार होते, महात्मा फुले यांचे आदर्श आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या प्रसंगी मनपाचे सभापती स्थायी समिती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक विशाल निंबाळकर व मनपाचे कवडू नेहारे, विकास दानव उपस्थित होते.